छत्रपती शिवरायांचा गनिमी कावा
गनिमी कावा याविषयी आपण अनेकदा फक्त ऐकलेले असते. परंतु गनिमी कावा म्हणजे नक्की काय? त्याची सुरुवात कोणी व कशी केली? या तंत्राचे फायदे कोणते आहेत? यामध्ये कोणती जोखीम आहे? तसेच यामध्ये कोणते तोटे होऊ शकतात? याचा अभ्यास आपण या अभ्यासक्रमात करणार आहोत. आजच्या दैनंदिन जीवनात प्रत्येकाला प्रचंड स्पर्धेला तोंड द्यावे लागते. आपल्यात क्षमता असूनही अनेकदा अपेक्षित यश मिळत नाही. त्यामुळे अनेकदा आपल्या पदरी निराशा येते. अशा वेळेला हे गनिमी काव्याचे तंत्र आपल्याला दैनंदिन जीवनात देखील अत्यंत उपयुक्त ठरू शकते.
गनिमी कावा या युद्धतंत्राचा उपयोग केल्याचे संदर्भ भारताच्या पौराणिक तसेच अर्वाचीन इतिहासासोबत अगदी प्राचीन काळापासून आढळतात. महाभारत युद्धामध्ये जयद्रथाला ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने हा सूर्य आणि हा जयद्रथ या तंत्राने मारले हाही एक गनिमी काव्याचा प्रकार होता.
ज्ञात इतिहासात मलिक अंबर या निजामाच्या सेनापतीने पहिल्यांदा तसेच शहाजी महाराजांनी देखील गनिमी कावा या तंत्राचा वापर केला.
👉छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी साम्राज्य निर्मितीमध्ये त्यांच्या वैयक्तिक गुणवैशिष्ट्यांबरोबरच त्यांच्या युद्धनीतीचाही फार मोठा वाटा आहे. त्यामध्ये गनिमी कावा या तंत्राचा त्यांनी जो परिणामकारक वापर केला आणि अल्पशा युद्ध सामग्री आणि कमीत कमी मनुष्यबळाचा वापर करून त्यांनी अत्यंत बलवान अशा शत्रूंना धूळ चारली. गनिमी कावा हे एक विलक्षण असे युद्धतंत्र आहे. मात्र त्याचा वापर फक्त युद्धातच होतो असे नाही. तर आजच्या काळात प्रत्यक्ष जीवनातही आपण त्याचा वापर करू शकतो... म्हणूनच
विश्व मराठी परिषदे तर्फे एक अत्यंत उपयुक्त असा ऑनलाईन अभ्यासक्रम आयोजित केला आहे
⬜ अभ्यासक्रमातील विषय :
1) पारंपरिक युद्ध तंत्रे
2) गनिमी कावा म्हणजे नक्की काय?
3) गनिमी कावा युद्धतंत्राचे प्राचीन व अर्वाचीन संदर्भ
4) जयतु, जयतु शिवाजी
5) चाणक्य आणि सन झू इ.
6) गनिमी कावा - आवश्यक साधने आणि पथ्ये
7) शत्रूबोध (4 F T - Find, Fix, Fight and Finish the Enemy)
8) समुद्रावरचा गनिमी कावा
9) गनिमी कावा : बचावात्मक आणि आक्रमक
10) गनिमी कावा युद्धतंत्राची आजच्या काळातील उपयुक्तता
✅ अत्यंत मर्यादित जागा - पूर्व नोंदणी आवश्यक
✅ मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे
✅ सर्व सहभागीना प्रमाणपत्र
सुचना:
1) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही.
2) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन भरा.
चौकशी / माहितीसाठी संपर्क - व्हॉट्सअॅप: 7066251262
विश्व मराठी परिषद : सक्षम, संपन्न, समृद्ध वैश्विक मराठी ब्रॅंडच्या निर्मितीसाठी विश्व मराठी परिषद कार्यरत आहे. जगभरातील १२ कोटी मराठी बांधवांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साहित्य-संस्कृती-उद्योजकता आणि युवा या आयमांतर्गत विविध उपयुक्त उपक्रमांनी जोडणे व मराठी माणसाची सर्वांगीण प्रगती साधने या उद्देशाने विश्व मराठी परिषद काम करीत आहे. जगभरातील ५२ देशातील मराठी लोक परिषदेशी जोडले गेले आहे व सातत्याने जोडले जात आहेत.