🎼 संगीतोपचार अर्थात म्युझिक थेरपी
▶️ ही कार्यशाळा कोणासाठी?
✅ संगीत क्षेत्रातील विद्यार्थी, गायक, वादक, कलाकार तसेच डॉक्टर्स, वैद्य, नर्सेस, थेरपीस्ट
✅ विविध आजारांनी ग्रस्त अशा रुग्णांसाठी.
✅ निरोगी लोकांमध्ये स्वास्थ्य टीकवून ठेवण्यासाठी
✅ सर्वसामान्य लोकांसाठीही ही कार्यशाळा अत्यंत उपयोगी आणि ज्ञानात भर घालण्यासाठी आहे
▶️ कार्यशाळेतील विषय :
✅ मानवी जीवनात संगीताचे महत्त्व
✅ भारतीय शास्त्रीय संगीताची ओळख
✅ संगीतोपचार - संकल्पना, समज, गैरसमज
✅ शास्त्रीय विवेचन (Scientific aspects of music therapy)
✅ संगीतोपचार तंत्र
✅ संगीतोपचार कोणासाठी?
✅ शारीरिक मानसिक आजारांवर उपयुक्तता
✅ संगीतोपचाराची व्याप्ती, उपयुक्तता आणि मर्यादा
✅ संगीतोपचारातील करिअर संधी
▶️ प्रत्येक दिवसाच्या सत्राची रूपरेषा :
✅ पूर्वार्धामध्ये माहिती
✅ संगीतोपचार तंत्राचा प्रात्यक्षिक अनुभव
✅ प्रश्न/ शंका निरसन
भारतीय शास्त्रीय संगीतातील कोणत्या स्वरांचा, रागांचा आपल्या शरीर क्रीया आणि मनावर कसा परिणाम होतो यावर आधारित उपचार म्हणजेच संगीतोपचार... ही थेरपी विविध प्रकारच्या मनोकायिक व्याधींवर अतिशय उपयुक्त अशी सहाय्यक किंवा पूरक उपचारपद्धती आहे. आजच्या आधुनिक जीवनशैली मुळे काही आजार मोठ्या प्रमाणात दिसून येतात. (उदा. निद्रानाश , बीपी, डायबिटीस, हार्मोनल इम्बॅलन्स, इ.) तर काही आजार दुर्धर आणि असाध्य आहेत . (उदा. हृदयरोग, स्मृतिभ्रंश, पार्कीन्सन्स, अल्झायमर, इ.) गतिमान जीवनशैली, मानसिक ताणतणाव यातून या व्याधी निर्माण झाल्या आहेत. अशा प्रकारच्या आजारावर उपयुक्त सहाय्यक थेरपी म्हणून म्युझिक थेरपी लोकप्रिय होत आहे.
संपूर्ण विश्व हे स्पंदनांनी भरलेले आहे असे आजचे आधुनिक विज्ञान आपल्याला सांगते. Vibrations... तरंग.. त्यातून निर्माण होणारे नाद, प्रतिनाद यातून सर्व विश्व गतिमान होते. हे तरंग संपूर्ण विश्र्वामध्ये, ब्रम्हांडामध्ये निनादत असतात, एकमेकांवर परिणाम करीत असतात. आजचे मॉडर्न क्वांटम फिजिक्स हेही यावर शिक्कामोर्तब करते. प्राचीन भारतीयांनी संगीताचा आणि संगीतशास्त्राचा सखोल अभ्यास केला होता. संगीतातील राग आणि आलाप, त्यातील नाद, त्यांचा मानवी शरीराबरोबर, विविध इंद्रियांबरोबर, अवयवांबरोबर असलेला संबंध त्यांनी अभ्यासला होता. शास्त्रीय संगीताबद्दल माहिती देणारे संगीत रत्नाकर, रागोपनिषद सारखे ग्रंथ यावर विस्तृत विवेचन करतात. संगीतोपचार ही एक सहाय्यकारी आणि पूरक थेरपी आहे.
✅ अत्यंत मर्यादित जागा - पूर्व नोंदणी आवश्यक
✅ मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे
✅ सर्व सहभा गीना प्रमाणपत्र
❎ एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही.
✅ नोंदणी करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा.
📲संपर्क / व्हॉट्सअॅप: 7066251262 📩
विश्व मराठी परिषद : सक्षम, संपन्न, समृद्ध वैश्विक मराठी ब्रॅंडच्या निर्मितीसाठी विश्व मराठी परिषद कार्यरत आहे. जगभरातील १२ कोटी मराठी बांधवांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साहित्य-संस्कृती-उद्योजकता आणि युवा या आयमांतर्गत विविध उपयुक्त उपक्रमांनी जोडणे व मराठी माणसाची सर्वांगीण प्रगती साधने या उद्देशाने विश्व मराठी परिषद काम करीत आहे. जगभरातील ५२ देशातील मराठी लोक परिषदेशी जोडले गेले आहे व सातत्याने जोडले जात आहेत.