top of page

प्रकाशक बना

19 ते 22 नोव्हेंबर | संध्या. 8 ते 9

भालचंद्र कुलकर्णी (ज्येष्ठ प्रकाशक, संपादक, प्रकाशन व नोंदणी प्रक्रिया तज्ज्ञ)

पुस्तक/नियतकालिक, निर्मिती, छपाई आणि प्रकाशन प्रक्रिया समजून घ्या. स्वतःच स्वतःच्या पुस्तकांचे प्रकाशन करणे ही या कार्यशाळेची मध्यवर्ती संकल्पना आहे. आज तंत्रज्ञानाने फार मोठी प्रगती केली आहे. पूर्वी पुस्तक, ग्रंथ प्रकाशित करणे ही फार किचकट प्रक्रिया होती. लेखकाला प्रकाशक मिळणे हेच फार अवघड होते. स्क्रीप्ट प्रकाशकाला दिल्यावर त्याचे टायपिंग, डी.टी.पी. करणे, त्यानंतर त्याचे मुद्रीत शोधन करणे, संपादन करणे आणि त्यानंतर ते छपाईसाठी जायचे अशी प्रक्रिया होती. तसेच मुखपृष्ठ तयार करणे हेही काम करावे लागत असे. त्याचबरोबर प्रस्तावना, अभिप्राय, आय. एस. बी. एन. क्रमांक घेणे, वर्तमानपत्रांमध्ये परीक्षण पाठवणे हे करावे लागत असे. आज तंत्रज्ञान सोपे झाले आहे. डी. टी. पी.करणारे, मुद्रीतशोधक, संपादक, मुखपृष्ठ बनवणारे चित्रकार स्वतंत्रपणे उपलब्ध झाले आहेत. आय. एस. बी. एन. क्रमांक लेखकाला ऑनलाईन मिळवता येतो. लेखक स्वतः प्रस्तावना मिळवू शकतो. त्यामुळे पुस्तक निर्मिती प्रक्रियेतील वेळ खूप कमी झाला आहे. तसेच प्रिंट ऑन डिमांड तंत्रज्ञानामुळे आता कोणत्याही पुस्तकाच्या पंचवीस ते पन्नास प्रतीही छापता येतात. त्यामुळे पुस्तकामध्ये फार मोठी रक्कम गुंतवून ठेवावी लागत नाही. तसेच ऑनलाईन पुस्तक वितरणाच्या विविध सुविधा आणि अमेझॉन, फ्लिपकार्ट सारखी पोर्टल निर्माण झाल्याने वितरण करणे सोपे झाले आहे. तसेच ऑनलाईन बँकिंगमुळे पुस्तकाची रक्कम थेट खात्यात जमा होऊ शकते. सोशल मीडियाच्या माध्यमातून पुस्तकाची प्रसिद्धी करणेही सोपे झाले आहे. कार्यशाळेमध्ये स्वतःच स्वतःचे पुस्तक कसे प्रकाशित करावे याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. नवोदित लेखकांना, संपादक तसेच पुस्तक/मासिक, नियतकालिक प्रकाशन व्यवसाय करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त अशी कार्यशाळा आहे.

▶️कार्यशाळेतील विषय :
✅ कोणतेही वृत्तपत्र, मासिक कसे सुरू करावे?
✅ प्रकाशन संस्थेची नोंदणी प्रक्रिया कोणती?
✅ प्रकाशन संस्थेसाठी कोणते कायदे आहेत?
✅ नियतकालिकांसाठी लागू झालेला नवीन कायदा कोणता? त्यानुसार नोंदणी प्रक्रिया कशी आहे?
✅ पुस्तकांसाठी नोंदणी प्रक्रिया (ISBN)
✅ शोध पत्रिका (Research Journal) साठीची नोंदणी प्रक्रिया
✅ लेखक आणि प्रकाशक यांच्यात करार कसा करावा?
✅ पुस्तकाची किंमत कशी ठरवावी?
✅ नियतकालिकांचे आर्थिक व्यवस्थापन कसे करावे?
✅ पुस्तके व नियतकालिकांचे जाहिरात आणि मार्केटिंग

अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती आपल्या व्हॉटसअप क्रमांकावर मागविण्यासाठी पुढे क्लिक करा. 

whatsapp-png-image-9.png

✅ अत्यंत मर्यादित जागा - पूर्व नोंदणी आवश्यक 

✅ मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे

✅ ​सर्व सहभागीना प्रमाणपत्र  

 

सुचना:

1) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही. 

2) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन भरा. 

चौकशी / माहितीसाठी संपर्क - व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

नोंदणी शुल्क : रु. 750/-

विश्व मराठी परिषद : सक्षम, संपन्न, समृद्ध वैश्विक मराठी ब्रॅंडच्या निर्मितीसाठी विश्व मराठी परिषद कार्यरत आहे. जगभरातील १२ कोटी मराठी बांधवांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साहित्य-संस्कृती-उद्योजकता आणि युवा या आयमांतर्गत विविध उपयुक्त उपक्रमांनी जोडणे व मराठी माणसाची सर्वांगीण प्रगती साधने या उद्देशाने विश्व मराठी परिषद काम करीत आहे. जगभरातील ५२ देशातील मराठी लोक परिषदेशी जोडले गेले आहे व सातत्याने जोडले जात आहेत.   

bottom of page