फुल झीरमुसले परी उमीद मोठी ऊमलण्याची.
पाकळ्या सुकल्या परी आस मोठी सुगंध देण्याची.
भान एकच होवो स्पश॔ त्या सुखद ऊन थेंबाचा.
आसक्ती करतोय हा जीव वाट ती पुन्हा जगण्याची.
कधी तपती दुःखाची अफाट ती ऊन.
कधी वर्षाव तो नेई कोवळ्या पाकळ्या वाहून.
कधी संगती सोबतचे काटे रुतुनीया.
परी वाट धरलीया इतरासी तृप्त करण्ययाची....
अशीच अवस्था आम्हा मानवी जीवाची.
कधी दुःखाची तप्ती ऊन कधी भिती वाहुन जाण्याची.
उमलून पाकळ्या देऊन सुगंध जगासी.
आस करतोय हा जीव वाट ती पुन्हा जगण्याची.
गोविंद थवली
Email.: govindthawalithawali@gmail.com
विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअॅप लिस्टमध्ये सामील व्हा - 7066251262 हा व्हॉट्सअॅप क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMP असा मेसेज पाठवा
खूप छान 👌👌