मला माहित आहे जाता जात नाही ती जात
परंतु आपल्याला करायचे आहे तिच्यावर मात
एकमेकां घेऊ सोबत
सगळ्यांचेच करू एकमत
खाऊ पानासोबत चुना, सुपारी आणि कात
आपल्याला करायचे आहे जातीवर मात
देऊ एकमेकां हात
करू जातीचा घात
झालेत लोकं जातीसाठी उन्माद
करायलेत एकमेकांत नेहमी वाद
देऊ एकमेकां साद
करू जातीला बाद
आपली स्वप्नं आहेत मोठी
जातीसाठी ठरवू नका ती खोटी
पुढा-यांनी जातीला केलं कायमची मोठी
सांभाळली आपली रोजीरोटी
मानवता हीच आपली जात
म्हणून आतापासूनच तिचीच पेटवू वात
जातीनं केली राडा
आता तिला कायमची गाढा
बांधा मानवतेचा वाडा
प्या लिंबू सोबत सोडा
जातीमुळे आपली होते अधोगती
कधी दाखवणार आपण जगाला प्रगती
जातीमुळे झालाय आपल्याला कटू घास
म्हणून तर हटवा तिचा कायमचा निवास
कवी- विश्वेश्वर कबाडे उर्फ शुभसंतती
व्हॉट्सअप क्रमांक- ९३२६८०७४८०
लिंग- पुरूष
शहर- अणदूर,ता.तुळजापूर
Email.: vishweshwarkabade41@gmail.com
विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअॅप लिस्टमध्ये सामील व्हा - 7066251262 हा व्हॉट्सअॅप क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMP असा मेसेज पाठवा
सार्थ आहे तुमची कविता