आहे मनोहारी जरी माझा हा मास्क
पण काय अडचणी येतात मला डोन्ट आस्क
कोविड मुळे हा माझ्या चेहऱ्यावर चढला
थोडे दिवस म्हणता म्हणता तिथेच थांबला
नातू माझा लहानसा मला हसून पाहतो
मी मात्र त्याला मास्क मधून फक्त दिसतो
दिसलो जरी त्याला ओळख पटत नाही
चेहऱ्यावर हावभाव नसलेला आजोबा त्याला पटत नाही
मास्क मुळे आपण सगळे भावनाशून्य चेहरे झालो
एकमेकांना हसून अभिवादन करायचे हेही विसरलो
समोरून मित्र भेटला तरी माझे हास्य त्याला दिसत नाही
आजकाल हा फारच शिष्ट झाला म्हणून तोही बोलत नाही
खरेदीला आम्ही मार्केट मधे जेव्हा जातो
सगळे मास्क घातलेले गिऱ्हाइकच तिथे असतो
कोणी काय मागितले ते दुकानदाराला कळत नाही
बावचळून शेवटी तो जे काही देतो ते नाही म्हणवत नाही
कधी जातो आम्ही सिनेमाला
पहिली अडचण येते तिथे काउंटर ला
किती तिकीट मागितले ते त्याला ऐकू येत नाही
शेवटी हाताची बोटे दाखवल्याशिवाय उपाय नाही
आता हेच मागतो मी वरदान खास
मोकळा व्हावा माझा आणि जगाचा श्वास
फुलावे आधीसारखे मोकळे हास्य सदा
आणि पुन्हा मित्रांना टाळ्या द्याव्या एकदा
दीपक भालेराव
आर्यावर्त, नाशिक,
सेल 9869332169
ई-मेल ddbhalerao1@gmail.com
ही कविता कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअॅप, फेसबुकवर शेअर करा.
Comments