आयुष्य सुखा-सुखी असताना
दुःखाचा वारा हळूच स्पर्शून जातो
मनातल्या वादळाला लाटांची सोबत होतो....
अस्थिर हे मन
दबलेल्या या भावना
सगळंच कसं नको नको होतं
जीवनात जाता संपून संवेदना....
किती आणि कुठपर्यंत सहन करायचं
हा प्रश्न सतत मनात विस्फोट निर्माण करतो
कितीही सकारत्मक असलं तरी संपवून टाकावं सगळं सांगतो...
पण मग येते आठवण काही सुखद क्षणांची
प्रेरक शब्द आठवतात काहींचे, काळजी वाटते कुटूंबाची
त्यांना सोडून जाणं सोपं असतं कदाचित
पण त्यांना समाजाला उत्तर द्यावे लागते हा विचार नसतो यत्किंचित.......
सोपं नसतं आयुष्य त्रास घेऊन जगणं
तितक अवघडही नसतं मनमोकळं बोलणं
येऊ द्या ना अडचणी, त्या कोणाला नाहीत
पण आयुष्य संपवून टाकणं हा मार्ग
कधीच सोडवत नाही खरं आयुष्याचं गणित....
क्रांती ज्ञानेश्वर शेलार
नाशिक
Email : krantidnyshelar@gmail.com
ही कविता कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअॅप, फेसबुकवर शेअर करा.
Comments