विस्कटलेल्या आयुष्याची कशी सावरावी घडी
जगता जगता जिवनाला जगण्याची असावी गोडी।।
कधी दुःखात तर कधी सुखाने धावत आहे हि जिवन गाडी।।
उघडून बघा एकदा आयुष्याची हि घडी ।।
वेळ काढून कधी तरी भेटावे आपल्या प्रियजना
नको तेथे पैसा अडका क्षणभर हसून बघा।।
धावपळ ही आयुष्याची थांबावी
आपलीच हसरी छबी आपल्याला दिसावी।।
आयुष्याची घडी उघडून सर्वत्र पसरावी।।
गुपीत यातील उकलून मस्त जिंदगी जगावी।।
नात्यांमधील असलेली गफलत जवळ येऊन दुर करावी।।
परत उकलून एक एक गोड आठवण या घडीत गुंडाळून मनाच्या कोपऱ्यात ठेवावी।।
गजानन पोते.
नं.: 9923978775
Email.: gajananpote86@gmail.com
विश्व मराठी परिषदेचे टेलीग्राम चॅनेल सबस्क्राईब करा
Comments