सकाळची वेळ , खरं तर दिवस-रात्रीच्या चक्राप्रमाणे मानवी जीवनाचे चक्र ही सुरू . लगबग, धावपळ, घराघरातून येणारे आवाज, वाहनांचे आवाज एक ना अनेक . आज मात्र असं काहींच जाणवत नव्हतं. शांतता होती आणि ती मनामनातील अस्वस्थता सांगून जात होती. चिंतेचे मळभ वातावरण भर भरून राहिलेले.
अचानक बाल्कनीत समोरच चार-पाच चिमण्या . त्यांचा चिवचिवाट सुरू होता पण मनातल्या विचारांमुळे त्यांच्या आवाजा आधीचं , त्याच प्रथम दिसल्या. मन क्षणभर हरखून गेले. त्यांच्या आवाजाने प्रसन्नतेची तार नकळत छेडली गेली. आणि चिमणीच्या पावलांनी मन स्वैरपणे भूतकाळात अगदी बालपणीच्या आठवणीत रमून गेलं.
साखर झोपेतून जागं व्हायचं तेच या चिमण्यांच्या आवाजाने . झोपेतून उठायला मन करायचं नाही, पण आई, आजी लहानग्याला कडेवर घेऊन अंगणात यायच्या आणि अंगणातल्या चिमण्यांची ओळख व्हायची, पावलं वाजली की चिमण्या भुर्रकन उडायच्या तर दुस-याच क्षणी पुन्हा अंगणात गोळा व्हायच्या . चाणाक्षपणे अंगणात टाकलेले धान्याचे दाणे टिपायच्या.
चिमण्यांचे आणि माणसांचे फार जवळचे नाते. माणसाची आणि चिमण्यांची ओळख अगदी पाळण्यापासून ची . बाळाची आई कामात व्यस्त असायची तेव्हा बाळराजे पाळण्यात झोपून हातापायांच्या कसरती करायचे, तेव्हा लाकडी पाळण्यावर टांगलेला चिमण्यांचा खेळण्याचं त्यांचा खरा मित्र असायचा
मांडीवरच्या लहानग्याला थोपटून झोपताना आई अंगाई गायची, त्यात ही चिमणीलाच बोलावणं व्हायचं. ' ये ग चिऊ , जा ग चिऊ, तुझ्या बाळाला माझ्या बाळाला टोपी शिवू ' म्हणजे चिमणी सुद्धा लेकुरवाळी आणि कुटुंब वत्सल असल्याची खात्री.
बाळाची अडखळणारी पहिली पाऊले अंगणात पडायची ती चिमण्यांना पकडण्यासाठीच. हातातला खाऊ त्यांना टाकण्यासाठी.
बाळाला भरवणा-या आईच्या ओठी पुन्हा चिमणी . आई सारखं म्हणते , एक घास चिऊचा , एक घास काऊचा. त्या चिऊ-काऊच्या घासाने बाळाचे पोट भरते कधी न तो झोपतो कधी आईला ही कळणे अवघडच असायचे.
पुढं शाळकरी जीवनात तर चिमण्यांशी आणखी संपर्क वाढायचा . शाळेची पाटी ओली करून पुसण्यासाठी ( पाटी ओली करण्याचे अनेक पर्याय असायचे , हे नव्याने सांगायला नकोचं ) ओली पाटी हवेत हलवत हलवत म्हणायचे , ' चिमणी- चिमणी वारा दे, माझी पाटी सुकू दे .' मग पाटी खरचं सुकते, असा बालबुद्धी चा समज. मग पाटी खरंच सुकायची.
शाळेतल्या बाईंकडून, गुरुजींकडून, वडीलधा-या मंडळींकडून गोष्टी सांगितल्या जायच्या. त्यात ही अग्रक्रमाने चिमणीचं असायची. सोबतीला कावळा ही यायचा. चिमणीच घरटं मेणाचे, कावळ्याचे शेणाचे. खूप मोठ्या पावसाने कावळ्याचे शेणाचे घर वाहून जायचे . पण चिमणीचे सुरक्षित असायचे . मग कावळेदादा पाहुणे बनून चिमणीच्या दाराशी हजर. आर्जवाने 'पुनः पुन्हा म्हणायचे. ' चिऊताई, चिऊताई दार उघड, चिऊताई चिऊताई दार उघड. पण चिऊताई पक्की हुशार. ' थांब माझ्या बाळाला अंघोळ घालते. थांब माझ्या बाळाला तीट लावते. अगदी बाळाला झोपते म्हणत - म्हणत तिचा पाढा काही संपचाच नाही. दाराबाहेर भिजून कुडकुडणारा कावळेदादा तोपर्यंत निघून ही जायचा. गोष्ट तशी साधीचं, सोपी. पण त्यातून ही चिमणीच्या संयमी पणाचा, स्वतःच्या संरक्षणासाठीच्या युक्तीचा समयसुचकतेचा आणि विवेकाचा संस्कार बालमनावर अगदी सहजपणे व्हायचाचं की.
पावसाच्या हलक्या पहिल्या सरींनी माती ओली व्हायची. सगळी मुले अंगणात गोळा व्हायची वर- वरची भिजलेली माती हळूवार हाताने गोळा करायची. मग एका पायाच्या चौड्यावर अगदी घोट्यापर्यंत ही ओलसर माती ओढायची. एक सारखी थापायची थापता- थापता ' चिमणी, चिमणी वारा दे, असं पुनः पुन्हा म्हणायचं. मातीचा ओलसरपणा थोडा कमी झाला की अलगद पाय बाजूला काढून घ्यायचा झालं चिमणीचं घरटं. त्यातून एखाद्याचं मोडायचं ही. मग रडारड सुरु व्हायची, भांडण व्हायची पण पुन्हा हा खेळ सुरू व्हायचा.
इकडं लहानांचा असा खेळ भरात यायचा आणि चिमण्यांचा खेळ मात्र वेगळा सुरू व्हायचा. साठलेल्या पाण्याच्या छोट्याशा डबक्यात त्या उतरायच्या . गोल गोल गिरक्या घ्यायचा. मातीत अंग घुसळायच्या, पुन्हा डबक्यात गिरक्या, आणि इतकंच नाही तर भिजलेले पंख सुकवायला त्या चक्क विजेच्या तारांवर बसून झोके घ्यायच्या, इकडून तिकडे, तिकडून इकडे सारख्या उडून जायच्या- यायच्या .
भर उन्हाच्या वेळी जिकडे - तिकडे सामसूम असायची, तेव्हा या अचानक आवाज करायचा. यांचा मुक्काम तेव्हा सोप्यातल्या छतावरच्या कौलांच्या खोबणीत, आढयाच्या पाकोडीत काडी-काडी गोळा करून बांधलेल्या घरट्यात असायचा. चिमण्यांनी का कालवा केलाय म्हणून घरातली मंडळी बाहेर येऊन पहायची तर एखादं सरपटणारा जनावर आलेलं असायचं. या संकटाची चिमण्या जणू बातमीच देत असायच्या. जणू त्या घरातल्या सदस्य असायच्या.
ब-याचं वेळा एखाद्याच्या गरीब स्वभावाची तुलना या चिमणीशी होते. गरीब बिचारी चिमणी असं म्हटलं जात. पण हीच चिमणी घरातल्यांचा घरभर वावर असताना चक्क स्वयंपाक घरातल्या शिंकाळयावर बसून झोके घेता घेता खाण्याचा आस्वाद घेताना दिसायची.
घरट्यात त्यांची छोटी -छोटी पिल्लं असायची, पिल्लं कसली ? लाल मांसाचे गोळेचं जणू. चुकून एखाद्या वेळी चिमणीच्या अनुपस्थित एखादं पिल्लू घरट्यातून खाली पडायच. सारी मुलं त्याच्याभोवती गोळा व्हायची . पण वडीलधारी मंडळी त्याला स्पर्श करू द्यायची नाहीत. माणसाच्या स्पर्शाने ती पिल्ले अस्पर्श होतात. मग पक्षी त्यांना आपल्या समूहात पुन्हा घेत नाहीत. असं सांगायची असा त्यांचा समज . म्हणजे पक्षी सुद्धा संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेतात. माणसांना हे कोण समजावणार ? असं असलं तरी चिमणी आपल्या पिलांना उडायला शिकवते. त्यांच्यासाठी दाणा- दाणा गोळा करून आणते. भरवता- भरवता स्वतः चं स्वतः खायलाही शिकविते. पण एकदा का पिलांच्या पंखात बळ आलं की आपल्या पंखांची उब काढून घेते. त्यांना स्वावलंबी बनवते. माणसांसारखे पांगळे नाही बनवत.
पूर्वी घरा-घरातून, रानातल्या वस्ती- वस्तीतून या सामाजिक पक्ष्यांची काळजी घेतली जायची. घराच्या परसदारी, सोप्याच्या आठयाला, गोठ्यात खोपी तून हुरडयाला आलेली कणसं टांगून ठेवली जायची. बायका अंगणात बसून दळण्यासाठी धान्य निवडायच्या. सुपात घेतलेल्या धान्याची पहिली मुठ चिमण्यांसाठी भिरकवयाच्या. चिमण्या ही इतक्या बिलंदर क्षणात फस्त टांगून ठेवलेल्या कणसाचे दाणे ,अंगणातले टाकलेले दाणे खाऊन स्वस्थ बसायच्या नाहीतचं. त्या आपला मोर्चा सरळ रानातल्या पिकाकडे वळवायच्या. दिवस-रात्र शेतकरी मयाणावर उभा राहून गोफण चालवायचा. रानात पत्र्याचे रिकामे डबे वाजवले जायचे. बुजगावणी ही उभी असायची. पण या सगळ्याला दाद देतील त्या चिमण्या कसल्या. त्या भारीच धटिंगण पोट भरल्याशिवाय हलायच्याच नाहीत. इकडून गोफण आली की तिकडे, तिकडून आली की इकडे उभं पीक फस्त.
खळे लागले कि मग यांची त-हा न्यारीचं. मळणी झाल्यावर वारे देऊन, उफतून स्वच्छ धान्याची रास, घरा- घरात गेली की मग राहिलेला सारा हिस्सा या चिमणाबाईंचाच खळ्यावरचं उरलेलं मळणमात्र अगदी सुफडा साफ करायच्या. अंगणात आलेल्या चिमणी- पाखरांसाठी मूठ पसा व धान्य भिरकावयची दानत होती तेव्हा.
यांच्या खाण्या बरोबर प्यायच्या पाण्याची ही सोय. घराघरातून केली जायची. रानातल्या खोपीजवळ फुटक्या डे-याच्या खापरात चिमण्यांसाठी पाणी ठेवलं जायचं.
परसदारात आणि घरा पुढच्या अंगणात ही अशाच प्रकारे फुटक्या रांजणाच्या खोलगट खापरात पाणी ठेवलं जायचं. घराभोवतीच्या परड्यात पाण्याची डोणी भरलेली असायची. झाडांवर छोटी-छोटी मडकी पाण्याने भरून लटकवलेली असायची. दमून भागून आलेल्या झाडांच्या फांद्यांवर झोके घ्यायच्या. सगळी कशी आबादी आबाद वाटायची. घराचं गोकुळपण घरापुरत मर्यादित राहायचं नाही. चिमण्यांसारखया पशु-पक्ष्यांना अभय देण्याची आपली संस्कृती. पण आज दुर्दैवाने त्यांची संख्या कमी कमी होत जाताना दिसते आहे. कारणे अनेक आहेत, पण परिणाम वाईटचं आहे.
20 मार्च तर चक्क जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा करावा लागतो आहे. आपण कोणाचे दिवस साजरे करत नाही अशा तिथीचं शिल्लक राहिल्या नाहीत. तरी ही स्वतःला सुसंस्कृत म्हणविणारे आपण शहरीकरणाच्या जाळ्यात पुरते अडकलो आहोत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासामुळे मोबाइल आले. मोबाईलच्या टॉवरमधून प्रचंड प्रमाणात चुंबकीय उत्सर्जन होऊ लागले. औद्योगिकी कारणामुळे, वृक्षतोडी मुळे पर्यावरणाचा -हास होऊ लागला. प्रदूषण वाढलं. घरांची रचना बदलली. लोकसंख्या वाढी मुळे सिमेंटची जंगले उभी राहिली. या सर्वाचा परिणाम पक्षी, प्राणी जगतावर झाला.
पक्ष्यांवर खर्च होणारा दाणा पाण्याचा भार माणसांसाठी हलका झाला. आज यात चिमण्याचं नाहीत. धान्य पिकतय पण बरकतच नाही. पुरवठी येत नाही. वस-वस वाढलीय. आम्ही मात्र स्वतःला प्रगत समजणारे चुकून एखादं चिमणी विना सापढलेलं घरट बंगल्याच्या दर्शनी भागात, बाल्कनीत केवळ ' शो 'पीस म्हणून टांगून ठेवतोय.ज्वारीचं एखादं कणीस बागेत टांगून ठेवतोय, पाणी ठेवतोय. पण चिमणी ते घेण्यासाठी येताना दिसत नाही. आज हीच अवस्था आपली झाली आहे. घरं आहेत, पण घरात असणारी माणसं त्यात नाहीत.
7 मार्च 2020 ला महाराष्ट्रात 'कोरना' विषाणूचा पहिला रुग्ण आढळला. आणि तोडगा शोधण्याचे काम सुरू झाले. या कोरोनाने आपल्याला जागेवर आणले नुसतचं जागेवर नाही, तर आपल्याचं घरात आपल्याला बंद करून घेऊन राहण्याची वेळ आली आहे. बुद्धीच्या आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर काळाच्या पुढे धावणारी आपण माणसं कित्येक दशके मागे गेलोयं. संचारबंदी सुरू आहे.
रस्त्यावरमाणसंनाहीत. प्रचंडप्रदुषणकरणारीवाहनेनाहीत.कारखाने, उद्योगधंदेबंदकारखान्याचेभोंगेनाहीत. धुराडीनाहीच. स्वच्छनिरभ्रआकाश. पारदर्शकवातावरणप्रदूषणमुक्तहवा. आपणमात्रचिंतेच्याकाळजीतकळवंडलोय. जागतिकमहामारीच्याभयानेपोखरूनगेलोयआणिसंख्येनेकमीहोतचाललेल्याचिमण्यामात्रबिनधास्तअगदीपूर्वीच्याचथाटातस्वच्छंदीउडतानादिसतआहेत. अंगणातलात्यांचाप्रवेशसुरूझालाय. काहीकाअसेना, सकारात्मकताहाहीआपलासहजगुणधर्मआहेचकी. आणिहो. मुंबई- पुण्यासारखीप्रचंडलोकवस्तीचीशहरंकोरोनाच्याबाबतीत 'रेडझोन'मध्येसध्याअसलीतरीप्रदूषणाच्याबाबतीत 'ग्रीनझोन'मध्येआलीआहेत. हेमात्रपहिल्यांदाचघडतेबरका!
नाव - श्रीमती भारती भीमराव झिमरे.
मोबाइल/व्हॉट्सअप क्रमांक - 9021307002
स्त्री
शहर- सातारा
Email.: jjayashreepatil24@gmail.com
विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअॅप लिस्टमध्ये सामील व्हा - 7066251262 हा व्हॉट्सअॅप क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMP असा मेसेज पाठवा
Comments