top of page
Writer's pictureVishwa Marathi Parishad

दृष्टिकोन



एखाद्या गोष्टीबददल,घटना,प्रसंगाबददल,व्यक्तीबददल तसेच कामाबददल आपल्याला जो काही दृष्टिकोण ठरवायचा आहे तो पुर्वग्रहांना बाजुला ठेवुन आपण स्व अनुभवातुन ठरविणे फार गरजेचे आहे

आपला आजचा विषय आहे ह्या जगात सर्वात चांगले अणि सर्वात वाईट काय आहे?पण खर सांगु का मित्रांनो तस पाहायला गेले तर ह्या जगात वाईट हे काहीच नसते.आपला दृष्टिकोण ती गोष्ट वाईट आहे का चांगली आहे? हे ठरवत असतो.अणि हा दृष्टीकोण निर्माण होतो तो आपल्या अनुभवांतुन.आपल्याला त्याविषयी चांगला अनुभव आला तर आपल्याला ती गोष्ट चांगलीच वाटेल अणि जर त्यातुन आपल्याला वाईट अनुभव आला तर आपल्याला ती गोष्ट वाईटच वाटते.मग आपण इतरांनाही तोच अनुभव सांगतो की मला ह्यातुन काही फायदा झाला नाही.त्यामुळ ते काम तु करत बसु नको.तुला त्यातुन काहीच फायदा होणार नाही.


पण खर सांगु का असे काही नसतेच.की एका व्यक्तीला एखाद्या कामातुन,एखाद्या गोष्टीतुन फायदा नाही झाला तर दुसर्यालाही त्यातुन काहीच फायदा होणार नाही.कारण प्रत्येकाचे अनुभव हे वेगवेगळे असतात.कोणाला चांगले अनुभव अनुभवायास मिळतात तर कोणाला वाईट अनुभव अनुभवायास मिळतात.


हे समजावुन सांगण्यासाठी मी तुम्हाला एक छोटेसे उदाहरण देतो.समजा तुमचा एखादा मित्र आहे जो एखादी स्पर्धा परिक्षा देतो अणि त्यात त्याला अपयश येते.मग तो तुम्हालाही सांगतो की स्पर्धा परिक्षा देऊ नको ती फार अवघड असते.मग तुमचाही विचार स्पर्धा परिक्षेविषयी तसाच होऊन जातो की स्पर्धा परिक्षा फार अवघड असते.म्हणुन ती द्यायचीच नाही.मग तुम्ही इतरांनाही तेच सांगत फिरता की स्पर्धा परिक्षा अवघड असते ती देऊ नको.तुझा वेळ वाया जाईल अणि तुला त्यात यशही मिळणार नाही.मग असे करत करत सगळयांचाच स्पर्धा परिक्षेविषयी एकच दृष्टिकोण निर्माण होत जातो की ती अवघड असते ती देऊन काहीच फायदा नाही.त्यात वेळ वाया घालवु नये.


पण मी म्हणतो समोरचा व्यक्ती त्या स्पर्धा परिक्षेत अपयशी झाला.मग तुम्हीसुदधा त्यात अपयशीच होणार हे तुम्ही कशावरुन ठरवता.तुमची अणि त्याची बुदधी सारखी आहे का?कदाचित त्याचे त्या अभ्यासात मन लागत नसेल किंवा त्याने एकाग्रतेने अभ्यास केला नसेल किंवा त्याने फक्त विरंगुळा म्हणुन त्याकडे बघितले असेल म्हणुन कदाचित तो अपयशी झाला असेल.याचा अर्थ असा नाही होत की तो अपयशी झाला किंवा तो कुठे अभ्यासात कमी पडला म्हणुन तो तुम्हाला सांगतो की ते करू नको मग तुम्हीही ते करायचे नाही.यात काही तथ्य आहे असे मला तरी वाटत नाही.


हा ही गोष्ट मी मान्य करतो की माणसाने स्वताच्या अनुभवांतुन शिकण्याबरोबरच इतरांच्याही अनुभवातुन शिकणे फार गरजेचे असते.पण जर त्या समोरच्या व्यक्तीचा अनुभव नकारात्मक असेल त्या नकारात्मक विचारांनाच घेऊन आपण आयुष्यभर चालायचे का?स्वता अनुभव घेऊन त्याविषयी सत्यता जाणुन घ्यायची?हे आपल्याला ठरवता आले पाहिजे.


थोडक्यात सांगायचे म्हटले तर मला एवढेच सांगायचे आहे की तुम्हाला एखाद्या कामाविषयी,घटना,प्रसंगाविषयी,तसेच एखाद्या व्यक्तीविषयी जर स्वताचे मत तयार करायचे असेल तर त्यासाठी आधी त्या व्यक्तीचा,घटना,प्रसंगाचा,कामाचा स्वता अनुभव घ्या मग त्यावर काही निष्कर्ष काढा कदाचित तुमचा अनुभव अणि इतरांच्या अनुभवात खुप मोठा फरक असु शकतो.

लोक मला सांगतात लेखक बनु नको त्यात काही एवढा स्कोप नाही.आर्थिक फायदा नाही.मग मी लोकांचे ऐकुण लेखक बनायचे माझे स्वप्न त्यागुन इतर लोक करता आहे अणि ज्यात त्यांना भरपुर यश मिळते आहे अशा ठिकाणी चालले जायचे.हे कितपत योग्य आहे?


आधी तुम्ही स्वता त्या क्षेत्रात पडा त्या क्षेत्राचा सखोल अभ्यास करा त्यात असलेल्या करिअरच्या संधी शोधा स्वता अनुभव घ्या मग ठरवा ना ते क्षेत्र चांगले आहे का वाईट आहे.इतरांच्या सांगण्यावरुन कशाला आपल्या स्वप्रांचा त्याग करतात.कदाचित त्यांच्या अणि तुमच्या अनुभवात फरकही असु शकतो. म्हणुन आपण एखाद्या गोष्टीबददल,घटना,प्रसंगाबददल,व्यक्तीबददल तसेच कामाबददल आपल्याला जो काही दृष्टिकोण ठरवायचा आहे तो आपण स्व अनुभवातुन ठरविणे फार गरजेचे आहे. योगेश सोनवणे ईमेल -yogeshsonawane26@gmail.com Whats app number -9356186023 जि. नाशिक ता. मालेगाव ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर शेअर करा.

522 views0 comments

Recent Posts

See All

'जात' म्हणजे काय?

जात म्हणजे जन्मत:च तुम्हाला जे जे मिळतं ते तुमचं 'जात' असतं. जात हा शब्द संस्कृत .. जन .. जा या धातूपासून आलेला आहे. जनन, जन्म, पूर्वज,...

Kommentare


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page