"एक ओळ लिहिती राहिली पाहिजे......
माझ्या नंतरही...."
कारण दाही दिशांचे हे दार,
ठेवले आहे सताड उघडे.......
तरी काही कलत नाही,
एवढा अंधार येतो कुठून गडे....
म्हणूनच म्हणतो एक ओळ...........//1//
आयुष्य स्वप्नाचे असते तसेच ते
भावभावनांचे असते......
आयुष्य जगायला शिकवते, तसेच ते
मरायलाही शिकवते.....
शेवटी ते शाप की वरदान,
हेही आपणच ठरवायचं असते......
म्हणूनच म्हणतो एक ओळ.........//2//
आठवण तुझी येता.....
मी भूतकाळात जातो-आठवता त्या
आणाभाका, तुझ्यातच संसारचित्र रेखीतो...
व समाजासाठी मी तुझी आठवण,
पुसून टाकतो........
म्हणूनच म्हणतो एक ओळ.........//3//
जी माणसे ध्येयाकडे नजर ठेऊन,
वाटचाल करीत असतात.......
ती सतत धडपडत असतात, लोकांना
ती वेडपट वाटतात....पण ती घडत असतात...
आणि बाकीचे मात्र सडत असतात....
म्हणूनच म्हणतो एक ओळ.......//4//
सुनामी आयुष्याची सप्तपदी चालत राहते,
वर्षामागून वर्ष गिलत जाते....नौकरी, बेकारी,
उपासमारीने .."उमेदीचे मधुचंद्र".......
चोहोकडून बलात्कार, भ्रष्टाचार, लाचारी,
राजकारण व आत्महत्येच्या महापूरानी
साजरे केले जातात ..!!!
म्हणूनच म्हणतो एक ओळ लिहिती राहिली
पाहिजे माझ्या नंतरही...........//5//
कवी: वसंत कुलकर्णी
कविता आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.
विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअॅप लिस्टला सामील होण्यासाठी आमचा 7066251262 हा क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMParishad असा मेसेज पाठवा.
Comments