या पाण्याचे काय ते मोल पाणी आहे अनमोल
तोरण्यावर बेडकीने दावियेला जलसाठा
स्वराज्य तोरण बांधताना तृप्त होई मर्द मराठा
कधी निर्माणक कधी विनाशक
कधी संजीवक कधी आश्वासक
विविध रूपे दिसे पाणी रोज सांगे आकाशवाणी
सत्तर टक्के पाणीसाठा घोट प्यायचा अगदी छोटा
या छोट्याला सांभाळाया राजस्थानी झिजविती काया
मोठा खड्डा खणुनि काढती सिमेंट लावुनी स्वच्छ करिती
शुभ्र वसने तोंड बांधिती पाऊस पाणी साठा करिती
वस्त्रगाळ ते पाणी होई तृषार्ताची तहान शमवी
ज्यांना पाणी खूप मिळते त्यांना त्याची किंमत नसते
मराठवाडा सुके तहाने पाणी वाहे कुठे नळाने
आपुल्या भावी पिढ्यांसाठी पाणी संचय करण्यासाठी
नदीजोड प्रकल्पासाठी सारे शिकुया यारे आता
सजग होऊनि जलसाक्षरता
सौ. उमा अनंत जोशी
२३.०३.२०२१.
Email.: anantjoshi2510@gmail.com
विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअॅप लिस्टमध्ये सामील व्हा - 7066251262 हा व्हॉट्सअॅप क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMP असा मेसेज पाठवा
सार्थ आहे तुमची कविता