जीवनचक्र चालू राहण्यासाठी निरंतर जन्म होणे अवश्यक आहे. प्रत्येक सजीव म्हणजेच मनुष्यप्राणी, पशू, पक्षी, कीटक व वनस्पती हे आपआपली उत्पती स्वत: करत असतात त्यामूळेच सृष्टितलावर जीवन हे अविरत चालू राहते. कोणत्याही मनुष्यप्राणी, पशू, पक्षी, कीटक व वनस्पती यांच्या पासून नवीन जन्म होण्यासाठी त्याच्या स्त्रीबीज व पुरूषबीज यांचा संयोग होणे अवश्यक आहे. वनस्पतीचा सुध्दा नवीन जन्म होण्यासाठी फुलातील स्त्रीकेशर व पुंकेशर या दोन्हीच्या संयोगानेच बीजाची निर्मिती होऊनच नवीन उत्पती होते. म्हणजे प्राणी व वनस्पती या दोघांची प्रजोत्पादन पध्दत ही सारखीच आहे. म्हणूनच संत ज्ञानेश्वर माऊली हे त्यांचा अभंग “अरे अरे ज्ञाना झालासी पावन” यामध्ये म्हणतात “अवघेची वैकूंठ हे चतुर्भुज आहे ” हे आपणस माहीत आहे. परंतु मला येथे हे निदर्शनास अणावयाचे आहे की वरील सर्व ज्ञान तेही अत्यंत वैज्ञानिक पध्दतीने संतज्ञानेश्वर माऊलीच्याही हजारो वर्षापूर्वी आयुर्वेदशास्त्राने सांगितलेले आहे. परंतू भारतीय वाङ्ग्मयाचा आपण शास्त्रीय पध्दतीने अभ्यास केला नाही किंवा त्यास आपण शास्त्र समजत नाही भारतीय संस्कृती देखील शास्त्रीय सिद्धांता वर आधारितच प्रगत झाली आहे पण आपण भारतीय वाङ्ग्मयातील शास्त्रीय सिद्धांताचे शास्त्रीय विवेचन करून जगाला सांगू शकलो नाही तर पाश्चिमात्यज्ञानच्या आधारे शिक्षण घेत आहोत. भारतीय वाङ्ग्मयातील आयुर्वेदशास्त्रात देखील बर्याच बाबतीचे शास्त्रीय पध्दतीने विवेचन केले आहे जे समजण्यास सहज व सोपे आहे.
जन्माचे चार प्रकार आहेत:
भूतानां चतुर्विध योनिर्भवति – जराय्वंडस्वेदोभ्दिद: |......||१६|| चरक शारीरस्थान अ. ३.
a). जरायुज (Born from Womb) : मनुष्य, पशू-प्राणी.
b). अंडज (Born from Egg) : पक्षी, साप.
(अंडज याचे दोन उपप्रकार आहेत?) –
c) स्वेदज (Wet Eggs) : fish, frog.
d) उदभिज (Dry Eggs) : झाड (पेड-पौधे), वनस्पती बीज.
वरील चार प्रकारानेच नवीन जन्म होतो; तसेच मला येथे आणखी एका अत्यंत महत्वाच्या बाबीकडे लक्ष वेधायचे आहे. आपण सर्वजण समजतो की स्त्रीबीज व पुरूषबीज यांचा संयोग होऊन गर्भ किंवा बीजांडाची (Embryo) निर्मिती झाली म्हणजे नवीन जन्म झाला. परंतु आयुर्वेदशास्त्र असे मानत नाही. आयुर्वेदशास्त्राप्रमाणे बीजांडाची (Embryo) गर्भामध्ये इन्द्रियांची वाढ झाल्यावर सत्वइन्द्रियांसोबत चैतन्याशी (आत्म्याशी) संयोग झाल्याशिवाय नवीन जीवाची निर्मिती होत नाही. नाहीतर आपल्याला प्राणिज अंडे व वनस्पती बीज म्हणजेच धान्य उदा. गहू, ज्वारी, मुग, हरभरा इ. खाण्यास मिळाले नसते. कारण विचार करा स्त्रीबीज व पुरूषबीज यांच्या संयोगा नंतर लगेचच (सलग) नवीन जीवाची उत्पती झाली असती तर अंड्यापासून लगेच नवीन जीव तयार झाला असता व धान्याच्या बिजा पासून वनस्पती तयार झाले असते. पण असे होत नाही कारण काही दिवस अंड्यांना उबविल्या नंतर अंड्यामध्ये नवीन जीव तयार होतो व वनस्पती बीज जमिनीमध्ये पेरल्या शिवाय नवीन रोप तयार होत नाही. म्हणजेच अंडे व धान्याचीबीजे हे तातपूर्ते निर्जीव असते? बीजांडा (Embryo) मध्ये जिवाचा (चैतन्याचा) नंतर संयोग होतो कारण –
न चात्मा सत्स्वीन्द्रियेषु ज्ञ: ......||१८|| चरक शारीरस्थान अ. ३.
म्हणजेच मन इंद्रियाशिवाय आत्मा ज्ञानी (प्रकट) होत नाही.
हे सविस्तर समजून घ्यावयाचे असेल तर “ ईश्वर संकल्पना नि आयुर्वेद ” हे पूस्तक व या पुस्तकातील “ चार्वाकाचे चैतन्य ” हे प्रकरण वाचावे.
डॉ सतीश गवळी, औरंगाबाद.
मो. ९४२१४२२०९३.
Email.: drsatishgawali@gmail.com
विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअॅप लिस्टमध्ये सामील व्हा - 7066251262 हा व्हॉट्सअॅप क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMP असा मेसेज पाठवा
चांगली माहिती दिलीत .