कोकण कोकण आमचे कोकण
असे नैसर्गिक सौंदर्याची खाण
गर्वाने सांगतलो कोकणी
माणूस
"येवां कोकण आपलाच आसा" !
सागरी संपत्तीची नसे वानवा
मत्स्यखाद्यप्रेमी असे कोकणी बुवा
आंबा,काजू, फणस रेलचेल
दिसे उन्हाळ्यात
दरवळे सुगंध ह्यांचा सार्या
आसमंतात !
स्वाभिमानी बाणा भरला, ह्यांच्या नसानसांत
परी अतिथीचे स्वागत,
प्रेमाने होतसे घराघरांत !
पारंपारिक खाद्यपदार्थांची,
ओळख गृहीणी करून देती
आंबोळी,पातोळी,कोंबडी-वडे, शिरवळ्या-गुळरसाचा,
देती आस्वाद मेजवानींचा
तृप्त होती अतिथी,स्वाद चाखूनी गृहीणीच्या हातचा !
घरगुती खानावळी चालती
कोकणात दारोदारी
अस्सल मालवणी जेवणाची
मजा घरच्या खानावळीत न्यारी
व्यवहार नसे तिथे, मायेची
फोडणी असे भारी !
आयुष्यात एकदातरी, अनुभूती घ्यावी प्रत्येकाने
स्वर्गसुखाची अनुभूती येई
प्रत्यक्षात, कोकणच्या वैभवाने
आठवणीत त्या रमून जातो
येणारा, परतूनी येण्या कोकणात
पायची निघत नसे तेथूनी,
नैसर्गिक वैभव पाहूनी कोकणचे,जाती डोळे दिपूनी !
पुष्पा सामंत.
नाशिक 27-10-2020.
Samant1951@hotmail.com
ही कविता कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअॅप, फेसबुकवर शेअर करा.
कविता चांगली आहे . लेखिकेने कोकणच्या निसर्ग पेक्षा तिथल्या खाद्यपदार्थांची जास्त ओळख करून दिली आहे. तरीही वर्णन आवडण्यासारखे आहे.
आवडली कविता. कोकणाबद्दल फारच आत्मियतेनं लिहिले आहे. शुभेच्छा.