“सुहास, what is this rubbish yaar ??? तू माझ्यावर संशय घेतोय, माझ्यावर. You know ,I never imagine this from you ... मला तुझ्याकडून ही अपेक्षा मुळीच नव्हती. तू तू माझा पासवर्ड हॅक करायचा प्रयत्न केला??? माझा???का ?? काय झालं तुला अचानक??? काय चुकीचं वागले मी?? मला विचारायचा होतास ,मी तुला आनंदाने दिला असता. पण डायरेक्ट प्रोफेशनल हॅकर ची मदत घेऊन तू हे केलंस...ohh my god... its too much now.” अमृता अगदी चिडून म्हणाली.
“अगं, अमृता तू समजते तसं काहीच नाहीये, मी सहज उघडून बघितला, त्याच्यात काय एवढ चिडायचं??आणि तो सचिन माझा मित्र आहे ,आणि त्याला हॅकिंग ची आवड आहे. प्रोफेशनल वैगेरे काहिनाही. आणि संशय अजिबात घेत नाहीये मी. आता बायकोचा मोबाइल पण पाहू शकत नाही का???”, सुहास जरा बुचकळ्यात पडल्यासारखा इकडे तिकडे बघत बोलला.
“ होना ,का नाही बघू शकत , पण विचारून ना...किमान पासवर्ड तरी. त्याच्यासाठी तुझ्या त्या रिकामटेकड्या हॅकर मित्राची कशाला मदत घ्यायची???”
“पण मी म्हणतो ,कशाला पाहिजे पासवर्ड वैगेरे मोबाइलला उगाच. आपण जर काही चुकीचं करत नाही तर का लपवायचं.”, आता जरा तिरक्या नजरेने तिच्या कडे पाहत तो म्हणाला.
“ येस येस, Now you are there.. म्हणजे तुला वाटतं की मी काहीतरी चुकीचं करतेच आहे तर. बरोबर आहे. सरळ सरळ म्हण ना की तुझा आता माझ्यावर विश्वास राहिला नाहीये असं. Good,आता पासवर्ड ठेवणचं चुकीचं आहे मग. म्हणजे मोबाइल मधले बँकेचे अँप कुणीही ऍक्सेस केले तरी चालतील, आपले पर्सनल फोटोज कुणीही पाहिले तरी चालतील, पण पासवर्ड नको... good, very good...”
“ मी तस म्हटलो का?? ठेव तू पासवर्ड ,पण मला तर सांगू शकते ना तू तो. आपण एकमेकांचे पासवर्ड शेअर करू शकतो ना.”
“ सुहास मला सांग आपण माझा टूथब्रश शेअर करतो?? माझा हातरुमाल शेअर करतो?? नाहीना , मग पासवर्डच कशाला?? its my personal space. आणि मी विचारला तुला कधी तुझा पासवर्ड??” , अमृता तावातावाने बेडमध्ये निघून गेली.
थोड्या वेळाने ती बाहेर आली व थोड्या रागातच म्हणाली, “ किचन मध्ये वाढून ठेवलं आहे, भूक लागली की जेवण करून घे."
“आणि तू??”
“ माझं पोट भरलं मघाशी तुझं बोलणं आणि वागणं बघून.”
किचन मधली ताटं तशीच पडली. दोन्ही न जेवताच झोपली. रागात.
सुहास आणि अमृता. वरचा सवांद ऐकून तुम्हाला समजलं असेलच की यांचं लव्ह मॅरेज झालं आहे ते. सहा महिन्यांपूर्वी त्यांचं लग्न झालं. सर्वांच्या परवानगीनेच. एका मित्राच्या रिसेप्शन पार्टीत भेटले एकमेकांना .सहा महिने रिलेशनशिप आणि सहा महिन्यात लग्न.पण ह्या जोडीचा एक प्रॉब्लेम आहे आणि तो म्हणजे , अमृता जॉब करते मुंबईत आणि सुहास पुण्यात. दोघांनाही ठीकठाक पगार आणि कामही. म्हणून वीकएंडला फक्त ते एकत्र राहतात आणि हप्ता भर एक पुण्यात तर एक मुंबईत. हे असं “मधू इथे आणि चंद्र तिथे” दोघांच्याही जीवावर येत होतं पण असलेला जॉब सोडणं पण शक्य नव्हतं म्हणून ही कसरत त्यांना भाग होती.
“ सुहास मला तुझ्याशी बोलायचं आहे”,सकाळी उठल्यावर अमृता म्हणाली.
“मलाही”,तिच्याकडे न बघतचं सुहास बोलला.
“ बोल ना मग”, अमृता.
“ कशाला, माझाच अपमान करून घ्यायला???”,सुहास.
“ तुला नीट बोलायचं आहे का???”,अमृता.
“ कालच्या प्रकारा विषयी बोलायचं का तुला ??”, सुहास म्हणाला.
“ हो, काल विषयीचं. काय असेल ते शांतपणे बोलू. तुझ्या मनात नेमकं काय आहे मला सांगशील तरी. आपण हे अस दूर राहण ,म्हणजे मी मुंबईत, तू इकडे पुण्यात, तुला अजिबात आवडत नाही हे मला समजत. आणि माझीही तीच अवस्था आहे ना.”, अमृता समजावत म्हणाली.
“ तुझी कसली आली तीच अवस्था.... तुला आहेत की भरपूर बोलायला तिथे.” सुहास गॅलरीतून दूर कुठेतरी पाहू लागला.
“ काय, काय बोलला तू आता, मला काय..??”
“ हो ,खर तेच बोललो,रात्री दोन दोन वाजतात तुला chat करता करता. आणि कसली आली तुझी अवस्था??एरव्ही दहा वाजे पर्यंत जागी राहायला तुला नाकी नऊ येतात. आणि मागील 10 दिवसापासून डायरेक्ट दोन??”, आता सुहास चा पारा जरा वाढला होता.
“ म्हणजे तू माझं last seen चेक करतो whatsapp वर??” अमृता.
“ मग नाही तर काय सीक्रेट कॅमेरे लावलेत का मी तुझ्या रूम मध्ये????आणि म्हणून तर तू परवा पासून last seen ऑफ करून ठेवलं आहेस.आणि आता हे नको सांगू की मी माझ्या बहिणीशी किंवा आईशी chat करत होती म्हणून”, सुहास.
“ सुहास???”अमृता ला काय बोलावं ते सुचेना.
“ जाउदे सरळ मुद्यालाच हात घालतो. कोण आहे तो ज्याच्याशी तू इतक्या रात्री chat करतेस?? समझु दे मला पण मुंबई च कल्चर.”,सुहास तिच्या कडे रोखून बोलू लागला
“ सुहास are you lost your mind??, तू काय बोलतो आहेस तुला कळतंय का??तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना??”,आता अमृताही चिडली होती.
“ नाही नाही , माझं डोकं आता आलं आहे ठिकाणावर ,पण ह्यापूर्वी नव्हतं ते ठिकाणावर, बर का.. किती विश्वास ठेवला होता मी तुझ्यावर आणि तू ही अशी वागली, शीटट......”,एवढ बोलून तो बाहेर जायला निघाला.
“ सुहास, अरे माझं जरा ऐकून तर घेशील प्लिज”, ती त्याच्या मागे धावली.
“ मला आता तुझं काही एक ऐकून घ्यायचं नाहीये, जे झालं ते फार झालं.आता मला आपल्या रेलेशन विषयी विचार करावाच लागेल असं दिसतंय.”
“अरे मला बोलू तर देशील”
“ मला आधी हे किती दिवसापासून चालू आहे ते सांग ,नाहीतर यापुढील तुझा निर्णय तरी सांग.” सुहास.
“ सुहास तू वेडा झालास का?? तू समजतोस तस मुळीच नाहीये.”
“ आता बस हं. मी काही दुधखळा बाळ नाहीये, समजतं मला सगळं. एवढ्या रात्री एक बाई दोनच व्यक्तींशी चाट करू शकते, आणि ती म्हणजे एकतर तिचा नवरा नाहीतर तिचा यार........”
“ सुहास, आता यापुढे एकही शब्द बोललास तर याद राख”,अमृता अतिशय मोठ्याने बोलली.
“ ऐकायचं आहे तुला मी इतक्या रात्री का जागरण करते ते, तर ऐक. हे सगळं मी तुझ्यासाठी करत होती.”
“ माझ्यासाठी???”,तो वाकून तिच्याकडे पाहू लागला आणि मोठ्याने हसू लागला.
“ हो तुझ्याचसाठी. तुला आठवतं आपण पुण्याला एका मॉल मध्ये गेलो होतो आणि तू तिथे apple चा लॅपटॉप बघितला होतास , पण किंमत पाहून तू तो परत ठेऊन दिला होतास. तो लॅपटॉप तुला मनापासून आवडला होता हे मी तुझ्या डोळ्यात पाहिलं होतं. आपण पुण्याला फ्लॅट घेतल्या पासून तू फार मन मारून जगत आहेस हे मला दिसत होतं. तुझ्या 60 हजार पगारातून 40 हजार फ्लॅट च्या हप्त्यात जातात .आणि माझ्या व तुझ्या उरलेल्या पगारात आपण दोन्ही ठिकाणचा खर्च कसातरी मॅनेज करतो. आणि आई पप्पांना पण पैसे पाठवतो. त्यामुळे सध्या आपली परिस्थिती तो महागाचा लॅपटॉप घेण्यासारखी नव्हती. तेव्हाच मी ठरवलं की काही जास्तीचं काम करून तो लॅपटॉप विकत घ्यायचा आणि तुझ्या वाढदिवशी तुला सरप्राईज गिफ्ट द्यायचा.म्हणून मी एक ‘वर्क फ्रॉम होम’ प्रकारचा पार्ट टाइम जॉब जॉईन केला. ऑनलाईन क्लास घेण्याचा. MNC कंपनी आहे ती, आणि मला त्यात US च्या स्टुडंट्स ला dotnet शिकवायच काम मिळालं. त्यामुळे मला रात्रीची शिफ्ट करावी लागते . रात्री 10 ते 2. आणि तुला तर माहीतच आहे ,मला रात्रीच जागरण अजिबात जमत नाही. त्यावर उपाय म्हणून मी जेव्हा झोप यायला लागायची तेव्हा whatsapp वर जोक्स वाचत बसायची आणि झोप गेली की पुन्हा काम.त्यामुळे माझं last seen एवढ्या उशिराचं दिसायचं. आणि त्यात तूझा असा काही गैरसमज होऊ नये म्हणून मी दोन दिवसांपासून last seen बंद केलं होतं. पण जे व्हायचं ते झालंच. आणि तू हे अस काहीही विचार न करता बोलायला लागलास.”,हे बोलताना आता तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं.
सुहास ला काय बोलावं तेच सुचत नव्हतं.आता त्याच्याकडे नेहमीप्रमाणे आपला मूर्खपणा मान्य करण्यावाचून पर्याय नव्हता.
👍 कथा आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.
शिवकुमार विश्वनाथ देवरे (चाळीसगाव)
मो: 8055643756
ईमेल: shivkumar.deore@gmail.com
नविन ब्लॉगचे नोटिफिकेशन येण्यासाठी विश्व मराठीच्या ईमेल लिस्टला सबस्क्राइब करा.
ब्लॉग आवडण्या सारखाच आहे. थोडक्यात छान प्रसंग सांगितला. मात्र मला असे वाटत आहे की कितीही प्रयत्न केला तरीही नव्या पिढीला इंगजी च्या मदती शिवाय मराठी बोलणे अवघड आहे. तरीही फार छान लिहिले आहे एवढे नक्की !
मराठी पेक्षा ईंग्रजी शब्द जास्त आहेत, it look better write in English