लाकडाऊन ही अशी घटना आहे की ,
तिला येणार्या अनेक पिढ्या लक्षात ठेवतिल.
लाकडाऊन मध्ये अनेक,
खर्या खोट्या शिक्क्यातील फरक
लक्षात आला.
कोण आपलं कोण परकं, कोणत्या
मित्रांत किती खरेपणा आहे, सर्व
समोर आले !!
या लाकडाऊनमध्ये मंदिर,
मस्जित, गुरुद्वारे, चर्च, सर्व बंद होते.
संसद, अदालत, शाळा, कालेज,
ट्रेन, विमान, बसेस
सर्व बंद होते, तसेच कारखाने, फॅक्टरी, दुकाने,
सर्व बंद -
फक्तकाय बंद झाले नाही तर,
आपल्या घरातील महिलांचे काम
आणि त्यांची सेवा,
बंद झाली नाही..
सकाळी लवकर उठून नाष्टा,
स्वयंपाक तयारी, भांडी धूणी,
घराची साफसफाई-लंच व
डिनर, आणि मुलामुलींची वेणीफणी.
सत्य तर असे आहे की,
महिलांचे काम बंद नाही तर डबल झाले !!
लाकडाऊनमध्ये सर्व गोष्टी डाऊन झाल्या,
पण आपल्या घरातील,
महिलांची हिम्मत आणि
त्याचं काम डाऊन झाले नाही !!
जेंव्हा जेंव्हा आपण या कोरोना
लाकडाऊनची आठवण काढू,
त्याच्या गोष्टी करू, तेव्हा तेंव्हा ,
आपण आपल्या घरातील महिलांचे,
योगदान, आणि त्यांची सेवा याची ठेवून,
त्याची तारीफ करणे जाण ,
या कर्तृत्वाचे ठेवावे स्मरण,
हेच आहे लाकडाऊनचे इतिपूराण!!!
वसंत कुलकर्णी.
vasantkulkarni293@gmail.com
विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअॅप लिस्टमध्ये सामील व्हा - 7066251262 हा व्हॉट्सअॅप क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMP असा मेसेज पाठवा
सुंदर लिहिले आहे तुम्ही !