शब्द येतात किती? जातात किती?
हे शब्दा तुला पकडू कसा?
तू अनेकांचा सारथी !तुला आहे सर्वांची काळजी !!
तू ठेवणार नाही कोणाला उपाशी !
हे शब्दा सजवू कसा?
वेळ प्रसंगी आहेस तू सोबती !
हे शब्दा विसरू नकोस तू मला !
तुझ्याविना नाही कोणी मला !!
तुला सांगू कसे जीवन सार्थक झाले माझे !
फक्त तुझ्यामुळे -फक्त तुझ्यामुळे !!
हे शब्दा मी नतमस्तक आहे तुझ्या पुढे !
आटवन आली तुझी म्हणून पाणी थेंब थेंब गळे !!
हे शब्दा पुन्हा एकदा कोटी कोटी नमन करतो तुला
हे शब्दा तूच माझा जीवन सारथी !!
हे शब्दा तुझ्या विना नाही कोणी मला !!
( कवी )
राहुल मधुकर सोनटक्के
महर्षी नगर, पुणे 37
मो. नं. 82082376118 (पुरुष )
वय 37
Email.:sonatakke.rahul1984@gmail.com
ही कविता कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअॅप, फेसबुकवर शेअर करा.
Comments