श्रीराम
- डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी
- Aug 5, 2020
- 1 min read

आदर्श जपला प्रभुरामचंद्रानी
संयम शिकविला कौसल्येने
माता कैकयीने अडकवले वचनी
वणवण फिरले प्रभू वनी
क्षमाशीलता शिकवली प्रभुंनी
भरताला पादुका देऊनी
बन्धुप्रेम दिले दाखवूनी
भक्ति शबरीची घ्या समजूनि
सत्याचा विजय होतो जीवनी
दाखविले सत्यवचनी प्रभुंनी
आयोध्या आनंदली भूमीपूजनानी
श्रीराममंदिर होईल उभारणी
संदेश सगळ्यांना देऊनी
संघर्ष विन नाही काही जीवनी
कर्तव्यपुर्ती नका सोडू तुम्ही
सजली आयोध्या विजयपताकानी
उजळली नगरी दिव्यांनी
कष्टाचा संदेश देऊनी
जपल्या संस्कृतिच्या आठवणी!
कवयित्री: सौ. अनामिका प्रविण मालपुरे (सातारा)
मो: 09604275287
कविता आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.
विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअॅप लिस्टला सामील होण्यासाठी आमचा 7066251262 हा क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMParishad असा मेसेज पाठवा.
Comments