top of page
Writer's pictureVishwa Marathi Parishad

शुभचिंतक


एक छत्री उडत उडत माझ्यापाशी येऊन म्हणते, करार एक करशील का ? तुला वाचवेन भिजण्यापासून हाती मजला धरशील का? गुलमोहर आणि निर्झरांतूनी, बकुळीच्याही काननातूनी; मुसळधार कधी मंद सरींतूनी, जलौघांतूनी नेशील का ? काडी पहिली तुटली तरीही, डोक्यावरती धरशील का ? वाऱ्याने जर उलटी झाले, सावरून मज घेशील का ? चेहऱ्यावरचा शून्य पाहता, ती थिजली, मागे सरली; नैराश्याच्या भरात केंव्हा, वाट स्वतःची धरली ? अक्षरश: ती उडून गेली, वाऱ्यावरती होऊन स्वार; शपथेवरही ऐकत नव्हती, माझ्यावरती चिडली फार. कोणीतरी सांगा तिला, माझ्या गावाची कहाणी; अवकाळी तेवढं सोडलं, तर डोळ्यांतच असतं पाणी. तहान माझ्या गावी असते, सदैव बहराची; ग्रीष्म कसा मी देऊ ? तिला तर ओढ वसंताची. म्हटली असती जरी मला ती, ग्रीष्मासह तू हवा; श्रावण माझ्या माहेराचा, नाही मजला नवा ! स्वप्नांपासून दूर तिला मी सहजच केले असते; निर्झर-मोहर माहेरी, का पुन्हा बहरले असते ? सौंदर्याची तिला नव्हे, पण सौंदर्याला गरज तिची; 'श्रावण'वासी 'मयुरा'संगे, 'मृदगंधी' व्हावी 'भेट' तिची.


साहित्यप्रकार - कविता

शीर्षक - शुभचिंतक

विषय - युवकांची स्वप्ने आणि समस्या

लेखकाचे नाव - सुहास धानोरकर

लिंग - पुरुष

गाव - परभणी

मोबाईल/ व्हॉट्सअँप क्र . 9284217984

ई मेल - suhassd12@gmail.com



ही कविता कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर शेअर करा.

322 views0 comments

Recent Posts

See All

Comments


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page