देवा...
पावले निघाली पंढरीच्या वाटेला
दमला वारकरी
दुमदुमला तुझ्या नामाचा गजर
मुखी पांडुरंग हरी
कधी होशील तु जागा
पायी पडल्यात भेगा
वाट मोकळी करून दे
तुझ्या दर्शनाला जागा
अरे बघ जरा त्याच्याकडे तो भुक नाही तहाण नाही
जागा मिळेल तिथे निजतो
अभंगात दंग होवून
तुझ्या नामात रंगतो
तुझ्या नामात भारावून
सोडतो घर दार
अंतरात दाटून येतो त्याच्या
तुझ्या भक्तीचा ऊर
दया कर त्याच्यावर देवा
त्याच्या नवसाला पाव
गर्भार कर तू त्या मातीला
नको देवू दुष्काळाच घावं
विटेवर ऊभा राहुन
नको बघु तू हे जगं
देव म्हणतात तुला
तसा तू देवासारखा वाग
जगला शेतकरी तर
जगेल हि दुनिया सारी
नाहीतर.....
तुच असेल एकटा देवळात
नसेल कोणी वारकरी
संजय धनगव्हाळ
Email.: chandudhan123@gmail.com
ही कविता कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअॅप, फेसबुकवर शेअर करा.
कल्पना सुंदर आहे . तुम्ही तर देवालाच भीती घातलीत शेवटी .