संस्कार शिबिरे
भारताबाहेरील विविध देशांमधील
मराठी भाषिक बांधव आणि त्यांच्या पाल्यांसाठी
9 जुलै ते 14 जुलै 2024
संस्कार शिबिरे संकल्पना - बाल, किशोर आणि युवा वयामध्ये मुलांच्या मनावर संस्कार होणे, त्यांना संस्कृती आणि परंपरांची ओळख होणे हे आवश्यक असते. दरवर्षी एप्रिल - मे महिन्यात आणि दिवाळी सुट्टी दरम्यान अशी शिबिरे आयोजित केली जातात. भारताबाहेरील विविध देशांमध्ये वास्तव्य करून असणाऱ्या मराठी भाषिक बांधवांच्या मुलांना शालेय सुट्ट्या या बहुदा १५ जुन ते १५ ऑगस्ट या दरम्यान असतात. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या पाल्यांना अशा शिबिरांमध्ये सहभागी होता येत नाही. विश्व मराठी परिषद, भीष्म फाऊंडेशन फॉर भारतीय नॉलेज सिस्टीम आणि श्रीसमर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांनी संयुक्तरित्या भारताबाहेरील मराठी बांधवासाठी संस्कार शिबिरे आयोजित केली आहेत. सज्जनगड येथे राहण्यासाठी स्वतंत्र खोल्या आणि विस्तृत व्यवस्था उपलब्ध आहे.
संस्कार ही भारतीय संस्कृतीची अनोखी अशी उपलब्धी आहे. संस्कारांना हजारो वर्षांची परंपरा आणि सातत्य आहे. संस्कारांच्या शिदोरीवरच भारतीय संस्कृती आणि सभ्यता टिकून आहे, जिवंत आहे आणि नित्य प्रवाहित आहे. या संस्कारांचा परिसस्पर्श आपल्या पुढील पिढीला, आपल्या मुलांना, किशोरांना, युवकांना झाला पाहिजे. त्यांनी तो अनुभवला पाहिजे. नुसती ऐहिक प्रगती, आर्थिक प्रगती म्हणजे जीवनाचे यश किंवा साफल्य नव्हे. प्रत्येकाच्या बुद्धीचा, भावनांचा, क्षमतांचा परिपूर्ण विकास, व्यक्ती, समाज आणि निसर्ग यातील संतुलन आणि आनंदी सहअस्तित्व यासाठी संस्कार आवश्यक आहेत. सद्गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार म्हणजेच संस्कार. योग्य वयामध्ये झालेल्या संस्कारांमुळे जीवन आदर्श होण्यासाठी मदत होते आणि अशा संस्कारीत पिढीमुळे राष्ट्राचाही उत्कर्ष होतो. संस्कार नीटनेटकेपणाचा, नवीन शिकण्याचा, जागृत असण्याचा, जबाबदारी समजण्याचा आणि व्यक्ती म्हणून उन्नत होण्याचा एक सहज सोपा मार्ग असतो. एकाच वेळी वैयक्तिक, सामाजिक आणि वैश्विक कल्याण साधता येण्याचा येण्याची शिकवण देणारा मार्ग म्हणजे संस्कार.
शिबिरामध्ये मार्गदर्शक म्हणून पू. योगेशबुवा रामदासी, स.भ. अजेयबुवा रामदासी, पू. मदन महाराज गोसावी, प्रा. क्षितिज पाटुकले, डॉ. अजित आपटे, ह.भ.प. डॉ. चारुदत्त आफळे, स्मिता कुलकर्णी, डॉ. नरेंद्र जोशी, विवेक वेलणकर, डॉ. कल्याणीताई नामजोशी, ॲड. मुग्धा बिवलकर, शैलेंद्र बोरकर, अभिजित जोग आणि अन्य मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्येक सहभागी बाल आणि युवा यांना मनाचे श्लोक, दासबोध आणि छ. शिवाजी महाराजांचे चरित्र भेट दिले जाणार आहे. तसेच दैनंदिन संस्कारांचा परिचय करून देणारा ग्रंथ दिला जाणार आहे.
१) बालसंस्कार शिबिर - वयोगट 9 ते 14 वर्षे
२) युवा संस्कार शिबिर - वयोगट 15 ते 24 वर्षे
शिबिर कालावधी - मंगळवार, 9 जुलै 2024 संध्याकाळ 5 pm ते शनिवार 14 जुलै 2024 रात्री 9 pm ( सोमवारी 15 जुलै रोजी सकाळी निघता येईल)
जुलै 2023 संस्कार शिबिरांच्या यशस्वी आयोजना नंतर आता जुलै 2024 मध्ये दुसरी बॅच...
मर्यादित जागा… ( प्रत्येक शिबिरासाठी फक्त 50 जागा ) त्वरित ऑनलाईन नोंदणी करा... पालकांसाठी निवास व्यवस्था उपलब्ध.
शिबिर ठिकाण - सज्जनगड जि. सातारा ( पुण्यापासून सुमारे १३० किमी अंतर )
ऑनलाईन नोंदणीसाठी अखेरचा दिनांक : 30 एप्रिल 2024 मात्र जागा भरल्यावर नोंदणी बंद होणार...
ऑनलाईन नोंदणी लिंक : www.vishwamarathiparishad.org/sajjangadssj2024
मागील वर्षीच्या शिबिरातील सहभागी बाल-युवा यांचे अनुभव पाहण्यासाठी : https://bit.ly/ssfeedback2023
महत्त्वाच्या सूचना -
1) बालसंस्कार शिबिर आणि युवा संस्कार शिबिर अशा दोन शिबिरांचे आयोजन केले आहे.
2) निवासाची व्यवस्था सामुदायिक स्वरूपाची स्वतंत्र खोल्यांमध्ये असेल.
4) सूर्यनमस्कार, योगासने, स्तोत्र-मंत्र पाठांतर अशी सत्रे सकाळच्या प्रसन्न वेळेत होतील.
4) थोरांची चरित्रे, विचारमंथन, समूह संवाद अशी सत्रे दिवसभरात असतील.
5) भ्रमंती आणि खेळ सायंकाळी असतील. त्यामुळे निसर्गरम्य वातावरणात सर्वांना गडावर भटकंतीचा आनंद मिळेल.
6) रात्री झोपण्यापूर्वी आनंदमेळा, माझी कला या सत्रांमध्ये आपल्यातील कलागुणांचे सादरीकरण करता येईल. असे सर्व वयोगटांना आनंद देणारे कार्यक्रम शिबिरामध्ये आहेत.
7) शिबिरांसाठी व्यवस्था देणगी शुल्क : बालकांसाठी – 100 USD, युवकांसाठी – 150 USD आणि निवास करणाऱ्या पालकांसाठी – 200 USD प्रत्येकी एवढी आहे.
ही रक्कम PayPal वरून ऑनलाईन भरता येईल.
अमेरिकेतील बांधवांना ही रक्कम पुढील Zelle Code द्वारा भरता येईल. : vmarathiusa@gmail.com
-
शिबिराचे संपूर्ण वेळापत्रक खालील लिंकवर उपलब्ध आहे.
-
तसेच पुढील लिंकवर जाऊन आपली नोंदणी करावी. प्रत्येकासाठी ( म्हणजे बाल, पालक, युवा ) वेगळा नोंदणी अर्ज भरून सबमिट करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधावा. विश्व मराठी परिषद :
प्रा. अनिकेत पाटील-
Calling +9175072 07645
WhatsApp +917066251262
ईमेल - sampark@vmparishad.org
अमेरिका- सौ. रश्मी नितीन बर्वे - Cupertino +1 (650) 415-1128
सौ. मानसी श्रीकांत पालकर - Seattle - +1 (425) 544-1509
उत्तरा भालेराव - Tampa Florida - +1 (814) 728-8154
युरोप - सौ. शैला धाबे - +46 76 525 90 25
आफ्रिका - सौ. भावना शेंड्ये - +254 714 501410
ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड - श्री. अभिजित भिडे - +61 402 081 194
आखाती देश - डॉ. धनंजय मोकाशी - +971 507911428
जपान- श्री. योगेंद्र पुराणिक - +81 90-9971-6181
जर्मनी - अजित रानडे - +49 1749225792
यूएई - पल्लवी उधळीकर - +971 505510129
युएसए - स्मिता वाळवेकर - +1 (510) 4682110
युएसए - पंकज कोठावळे - +1 (510) 8331397
यूएई - अजित वसंत रानडे - +971 503598741
आयर्लंड - मनीष गाजरे - +35 3899663346
काही महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे ( FAQ )
१) प्रश्न : निवास व्यवस्था कशी असेल ?
उत्तर : निवास व्यवस्था एकत्रित सामुदायिक असेल. स्त्री/पुरुष, मुले/मुली, युवक/युवती अशी स्वतंत्र निवास व्यवस्था असेल. एका खोलीमध्ये ६ ते ८ जण राहतील. ॲटॅच्ट् टॉयलेट व्यवस्था उपलब्ध नाही. गादी, उशी, चादर उपलब्ध आहे.
.
२) प्रश्न : शिबिरासाठीची मुले आणि त्यांचे पालक यांना एकत्र एका खोलीमध्ये राहता येईल का ?
उत्तर : नाही. संस्कार शिबिरांमध्ये मुलांनी स्वतंत्र राहणे अपेक्षित आहे.
३) प्रश्न : मुलांबरोबर पालक येणे अत्यावश्यक आहे का ? एक पालक चालतील का ? पालक नसल्यास आजी आजोबा चालतील का ?
उत्तर : मुलांबरोबर पालक असण्याची सक्ती नाही. पालक एक किंवा दोन्हीही चालतील. आजी आजोबाही चालतील.
४) प्रश्न : भोजन व्यवस्था कशी आहे ?
उत्तर : भोजन व्यवस्था पूर्णतः शाकाहारी आहे. सात्विक, पौष्टिक आणि महाराष्ट्रीयन पद्धतीचा नाश्ता, भोजन असेल. चहा, कॉफी, दूध उपलब्ध असेल.
५) प्रश्न : ॲलर्जिक फूड उपलब्ध असेल का ?
उत्तर : आधी कल्पना दिल्यास ॲलर्जिक फूड उपलब्ध करून दिले जाईल.
६) प्रश्न : वयोगटात न बसणारी मुले बरोबर आली तर चालतील का ? उदा. आई, वडील, १० वर्षांची मुलगी आणि ४ वर्षाचा मुलगा असेल तर काय करायचे ?
उत्तर : लहान मुलांना पालक आणि बालांबरोबर येता येईल.
७) प्रश्न : सेल फोन / इंटरनेट पॉलिसी काय आहे ?
उत्तर : गडावर रेंज येते. मात्र सेलफोन बंद करून ठेवावे लागतील. विश्रांतीच्या वेळी / रात्रीच्या वेळी मर्यादित वापर करता येईल.
८) प्रश्न : व्हिडिओ गेम चालतील का ?
उत्तर : व्हिडिओ गेम्स, ipad वरील गेम्स यांना सक्त मनाई आहे. शिबिर सुरू होण्यापूर्वी जमा करून ठेवावे लागतील.
९) प्रश्न : बरोबर काय आणावे
उत्तर : १) ६ दिवसांसाठी आवश्यक कपडे २) दंतमंजन, टॉर्च, कंगवा इ. वैयक्तिक सामान ३) पावसाळी हवा असल्याने रेनकोट किंवा छत्री/ ब्लँकेट, कानटोपी बरोबर आणावी ४) काही औषधे नेहमी घेत असल्यास बरोबर आणावीत.
१०) प्रश्न : वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे का ?
उत्तर : होय. शिबिरा दरम्यान गडावर आवश्यक ती वैद्यकीय सेवा आणि डॉक्टर उपलब्ध आहेत.
११) प्रश्न : शिबिरा दरम्यान संवादाची आणि प्रशिक्षणाची भाषा कोणती असेल ?
उत्तर: मराठी + इंग्लिश (मिंग्लिश) भाषा सहज, सोपी आणि आत्मीय संवाद पद्धती असेल.
१२) प्रश्न : वेशभूषा कशी आणि कोणती असणे अपेक्षित आहे ?
उत्तर : भारतीय पद्धतीची मंगलमय वेशभूषा अपेक्षित आहे. मुलांसाठी टी - शर्ट, बर्म्युडा, हाफ पँट, बुश शर्ट आणि मुलींसाठी कुडता, सलवार कमीज असा शरीर योग्य प्रकारे झाकले जाईल असा पोशाख असावा. सज्जनगडाचे पावित्र्य राखले जाईल अशी वेशभूषा आणि आचरण अपेक्षित आहे.
१३) प्रश्न : शिबिरासाठी शुल्क किती आहे ?
उत्तर : या शिबिरांसाठी व्यवस्था देणगी
बालकांसाठी – 100 USD, युवकांसाठी – 150 USD आणि निवास करणाऱ्या पालकांसाठी – 200 USD प्रत्येकी एवढी आहे.
(या संदर्भाने देणगी केवळ विश्व मराठी परिषद स्विकारतील.) ही देणगी PayPal वरून ऑनलाईन भरता येईल.
अमेरिकेतील बांधवांना ही रक्कम पुढील Zelle Code द्वारा भरता येईल. : vmarathiusa@gmail.com
१४) प्रश्न : मुलांनी / युवकांनी येताना त्यांचा खाऊ, चॉकलेट्स, चिप्स व इतर पदार्थ बरोबर आणले तर चालतील का ?
उत्तर : नाही. शिबिरामध्ये स्वतंत्र स्वतःसाठी खाद्य पदार्थ आणणे आणि खाणे अपेक्षित नाही.
१५) प्रश्न : शिबिरांमध्ये फक्त दोन किंवा तीन दिवस असे अर्धवेळ सहभागी होता येईल का ?
उत्तर : नाही.